ठेकेदार व सहका्यांकडून मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्या जवळ तरुणाला मारहाण

मारेगाव :तालुक्यातील करणवाडी फाटा परिसरात पोल उभारणीच्या कामावरून झालेल्या वादातून एका तरुणाला ठेकेदार व त्याच्या सहकार्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रदीप नागोराव आत्राम (रा. नरसाळा, ता. मारेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी आत्राम हे मारेगावहुन नरसाळा येथे दुचाकीने जात असताना करणवाडी फाट्याजवळील ट्रक विसावा स्थळा जवळ पोल उभारणीसाठी टाकलेल्या गोट्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्मण झाला होता. याबाबत त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या टूरॅक्टर चालकास विचारणा केली असता, "थांब, आमचा ठेकेदार येत आहे," असे उत्तर देण्यात आले. थोड्याच वेळ्ळात ठेकेदार, टूरक्टर चालक व त्यांचे दोन साथीदार घटनास्थळी आले. त्यांनी प्रदीप आत्राम यांना रस्त्याच्या कडेला नेऊन लोखंडी रॉडने पाठीवर व हातावर मारहाण केली. तसेच हाताबुक्क्यांनी चेहरा व डोक्यावर मारून जखमी केल्याचे फि्यादीत नमूद आहे.या हल्ल्यातील तक्रारीनुसार आरोपींची नावे गिरीधारी बाबूलाल सैनी (२५), भोजराज भरतलाल सैनी (२१), छोटू रामकिशोर मिना (३০) व एक अनोळखी व्यक्ती अशी असून सर्वजण रा. गडमोरा, नादोली, करोली (राजस्थान) येथील आहे.जखमी अवस्थेत प्रदीप आत्राम यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ११८(९), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
Previous Post Next Post