वणीचे मोट्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचा भगवा झेंडा घेतला हाती





वणी :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील नंदनवन निवास येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणारे प्रमुख नेते:
आशिष खुळसंगे (माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष वसंत जिनिंग वणी, माजी झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष),दीपक भैया कोकास (उपजिल्हाप्रमुख – उ. बा.ठा),गजानन किनेकर (माजी तालुकाप्रमुख तथा काँग्रेस नेते),
राजू तुरणकर (माजी नगरसेवक तथा माजी शहरप्रमुख – उभाठा),अजिंक्य शेंडे (युवासेना उपजिल्हाप्रमुख),
पंकज मुंडे (माजी नगरसेवक – काँग्रेस),
डॉ. मारुती माशेलकर (माजी सरपंच, आडेगाव),
शंकर पाचभाई (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक),विलास निखाडे (माजी सरपंच, मारेगाव),
सोमेश्वर गेडेकर,गोपाल खामनकर (मारेगाव),राजू वनकर (यवतमाळ शहर उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट),प्रदीप कांबळे (सामाजिक कार्यकर्ता),नितीन निघोट (शहराध्यक्ष – युवक राष्ट्रवादी शरद पवार गट)या सर्वांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करत शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ या पक्षप्रवेशामुळे वणी विधानसभा तसेच यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस आणि उभाठा गटाला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर:पराग पिंगळे ( पश्चिम विदर्भ समन्वयक शिवसेना )हरीहर लिंगणवार, (जिल्हा संपर्क प्रमुख),राजुदास जाधव (जिल्हाप्रमुख),
सुरेश चिंचोळकर, ( पश्चिम विदर्भ प्रमुख, आदीवासी विभाग )श्रीधर मोहोड (जिल्हा सम्पर्क प्रमुख ),
गजानन ढोमाळे, यवतमाळ जिल्हा प्रमुख शिवसेना..
निलेश बेलोरकर,, शहर प्रमुख यवतमाळ.
विशाल कीन्हेकर (मारेगाव तालुका प्रमुख),
बाळू चेडे (झारी तालुका प्रमुख)यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी नवागतांचे स्वागत करत संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. विकासकामे आणि जनहिताचा अजेंडा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Previous Post Next Post