प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या चक्काजाम आंदोलनाला खा. धानोरकरांचा ठाम पाठिंबा..!!_

उकणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींना न्याय मिळवून देण्यासाठी 3 मे पासून पुकारण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ठाम पाठिंबा दर्शविला आहे. रविवारी काँग्रेस नेते श्री. संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये वणी तालुक्यातील मौजे उकणी येथील सुशिक्षित, कुशल, अकुशल तसेच बेरोजगार युवक-युवती आणि हेव्ही वाहन परवाना धारक चालकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी अधोरेखित करण्यात आली. उकणी परिसरातील सुमारे 200 हून अधिक कामगारांना एम/एस नारायणी अँड सन्स कंपनीमध्ये प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे.

मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून या मागणीसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे स्थानिक युवकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक जबाबदारी असतानाही दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

यामुळे अखेरचा पर्याय म्हणून उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने 3 मेपर्यंतची अंतिम मुदत कंपनीला दिली आहे. निर्धारित मुदतीत मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेण्यात आली असता त्यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी निवेदन स्वीकारत, संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शवित, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अध्यक्ष श्री. स्वप्नील गोवारदीपे, उपाध्यक्ष श्री. अजय खाडे, सचिव श्री. विजय कार्लेकर, कार्याध्यक्ष श्री. विनायक येसेकर, सहसचिव श्री. प्रभाकर खोब्रागडे, कोषाध्यक्ष श्री. मनोज खाडे तसेच सदस्य श्री. कान्हू लोनगाडगे, श्री. विशाल गजानन चिंचोलकर, श्री. नरेंद्र खाडे, श्री. प्रथम अंड्रस्कर, श्री. रोशन गोबाडे, श्री. शुभम चिंचोलकर, श्री. सुमेध अंड्रस्कर, श्री. अमित पारशिवे, श्री. विजय येमूर्ले, श्री. सूरज पारशिवे, श्री. अरुण डाहुले, श्री. किसन पारशिवे, श्री. यश शिवरकर, श्री. सचिन येमूर्ले, श्री. साहिल जोगी, श्री. रविंद्र जुनगरी, श्री. विशाल निब्रड, श्री. साईनाथ ठमके, श्री. संतोष दुधूलकर, श्री. रामकिसन पारशिवे, श्री. सुभाष ढवळे, श्री. प्रशांत पाटील, श्री. अक्षय ढपकस, श्री. सूरज काकडे, श्री. संतोष धोंडे, श्री. रंजित पारशिवे, श्री. मयूर सातपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती
Previous Post Next Post