वणी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकाल जाहीर झाला असून वणी नगर परिषदेवर भाजपाने आपला झेंडा फडकविला तर डॉ संचिता विजय नगराळे यांचा पराभव करून सौ.विद्या खेमराज आत्राम यांनी ४७९२ मतांच्या आघाडी ने नगरअध्पक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला आहे
तर भाजपचे 18 नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे भाजपाकडे एकहाती सत्ता आली आहे . यामध्ये 6 शिवसेना( उबाठा ) पक्षाचे ,तर 3 काँग्रेस पक्षाचे व २ अपक्ष तर शिंदे सेनेने खाते उघडले नाही.असे एकूण 29 नगरसेवकांची निवड झाली आहे त्यामुळे वणीच्या नगर पालिकेवर आता भाजपाची सत्ता आली असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत गुलाल उधळून फटाक्यांची अतिषबाजी केली व शहरा मध्ये मिरवणुक काडून माजी आमदार बोदकुरवार यांनी वणी करांना हात जोडून धन्यवाद केले.
यामध्ये प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक रिता महेश पहापळे, वैशाली विनोद वातीले, लक्ष्मण महादेव उरकुडे, अर्चना संजय पुनवटकर, राकेश लक्ष्मण बुग्गेवार, सोनाली प्रशांत निमकर, रितीक लक्ष्मण मामीडवार, उषा डुकरे, नितीन धाबेकर, प्रमिला चौधरी, आरती वांढरे, अनिल चिंडालिया, रेखा कोवे, लवली लाल, पूजा रामगिरवार, मनोज सीडाम, मनीषा गव्हाणे, अर्चना झिलपे यांची निवड झाली तर शिवसेना उबाठा पक्षाचे अजय पांडुरंग धोबे, प्रणाली गणेश देऊळकर, अनिकेत बदखल, सुधीर थेरे, किरण देरकर, गुलाम रसूल रंगरेज यांची निवड झाली आहे तसेच काँग्रेस पक्षामधून करुणा कांबळे, अलका मोवाडे, सैफुर रहेमान व अपक्ष नगरसेवक धनराज रमेश भोंगळे, अब्दुल हाफिज, असे एकूण 29 नगरसेवक निवडणुकीत निवडून आले आहे.