वणी विधान क्षेत्राचे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे आज रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी लिलावती हॉस्पिटल, मुंबई येथे झालेल्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजजीवनात अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली आहे. जनतेसाठी सदैव झटणारे, संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकसंतप्त कुटुंबीयांना व समर्थकांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏