वणी प्रभाग क्रमांक १०/११, टागोर चौक, वणी येथे नगरपरिषदेच्या ट्यूबवेल कामाचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
नगरपरिषद निवडणुकीनंतरचे पहिलेच भूमिपूजन व पहिले विकासकाम सुरू होत असल्याचा हा अभिमानाचा क्षण आहे.
या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, भाजपा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, प्रभाग १०/११ चे नगरसेवक व मनोज सरमुकदम, भाजपा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विकास, पारदर्शकता आणि जनहितासाठी कटिबद्ध असलेली भारतीय जनता पार्टी
निवडणुकीतील शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवून
पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि दर्जेदार विकासाला गती देत आहे.ही केवळ सुरुवात आहे
वणीचा विकास हीच आमची ओळख आहे