महाएल्गार मेळाव्यात शेतकरी हजारो च्या संख्येने, 30जून 2026पर्यंत मुदत,,बच्चू भाऊ कडू

वणी  :4जून 2026 रोजी शहरातील शासकीय मैदानावर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महाएलगार शेतकरी मेळाव्याने हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी हजेरी लावली. हा मेळावा शेतकरी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आणि त्यात माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका करताना शेतकयांना संघर्षासाठी स्ज राहण्याचे आवाहन केले. : शासंकीय मैदान पाण्यार्ची टाकी, वर्ण प्रहार वणी मेळाव्यात अध्यक्षीय भाषण करताना बच्चू कडू म्हणाले, की शेतकयांना पेरणीपासून ते काहणीपर्यंत सतत लुटले जात आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा लहाई उभी करणे चांगले, असे सांगत त्यांनी शेतक्यांना एकजुटीचे आवाहन केले. जात, धर्म आणि पक्ष विसरुन सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पूर्ण अपंगांना पेन्शन न देणा्या सरकारचीही त्यांनी कठोर शब्दांत समीक्षा केली.कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला थेट इशारा दिला. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी जाहीर न झाल्यास 1 जुलैपासून राज्यात एकही रेल्वे गाडी चालू देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. यासह, वन्यजीव समस्या आणि हमीभावासाठी राष्ट्रीय महामार्ग रोको आदोलन आणि रामटेक ते ताडोबा पदयात्रेीही तयारी जाहीर करण्यात आली. मेळाव्यात ज्येष्ठ शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप, विजय निवल, देवराव धांडे, दशरथ पाटील, अनिल हेपट, सतीश देरकर, दीपक चटप, मोबिन शेख, राजु भोंगळे, रघुवीर कारेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोहोकर यांनी केले, तर आभार मोबिन शेख यांनी उपस्थित होते 
Previous Post Next Post