मच्छिन्द्रा येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश

मारेगाव : राज्यात विविध भागांत इतर पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्ष मध्ये जाहीर प्रवेश सुरू असून मारेगाव तालुक्यातही भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. मच्छिन्द्रा येथील गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते मधुकरराव कुळसंगे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
यावेळी नत्थू गेडाम (ग्राम सदस्य), संजय देवतळे, उमेश क्षीरसागर, अविनाश किनाके, गणेश परचाके आणि गौरव उईके यांनीही जाहीर पक्षप्रवेश करत भाजपच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
हा पक्षप्रवेश सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या निवासस्थानी भाजप तालुका अध्यक्ष श्री अविनाश भाऊ लांबट आणि तालुका सचिव अमोल कुमरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून भाजपची संघटनात्मक घडी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Previous Post Next Post