मोफत रेती वाटपाचा दांडगाव कोसारा घाटावर शुभारंभ

मारेगाव :पंचायत समितीला मंजुर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांची स्वप्ने अधुरे होती. ही समस्या लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या निर्देशानुसार, तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या आदेशान्वये तथा मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दांडगाव तथा कोसारा रेती घाटातुन उत्तम रेती मोफत वाटप करण्याचा शुभारंभ 26 फेब्रुवारीला करण्यात आला आहे. 
शासनाच्या वतीने गरीब तथा गरजु लाभार्थ्यांना कायम स्वरुपी निवारा मीळावा यासाठी विविध घरकुल योजना मंजुर करण्यात आली आहे. मात्र तालुक्यात रेती घाट सुरु नसल्यामुळे अनेक घरकुल लाभार्थी योजनेचे उदिष्ट पुर्ण करु शकले नाही.त्यामुळे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी तालुक्यातील कोसारा व दांडगाव रेती घाटातुन घरकुल लाभार्थ्यांना रेती मीळावी असा प्रस्ताव वरीष्ठ पातळीवर पाठविला होता. यापुर्वी सावंगी डेपोत शिल्लक असलेली गाळ मिश्रीत रेती वाटप करण्याचा वरीष्ठ पातळीवरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती.मात्र या वाळुला स्थानिक पदाधिकाऱ्यानी विरोध दर्शवुन दर्जेदार रेतीची मागणी केली होती त्यामुळे या मागणीची दखल घेत तहसीलदार निलावाड यांनी दांडगाव तथा कोसारा रेती घाटाचा प्रस्ताव पाठविला होता.या प्रस्तावाला वरीष्ठ पातळीवरुन मंजुरी मीळाली असल्यामुळे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 26 फेब्रुवारीला या रेती वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी घरकुल लाभार्थीसह भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे,मनसेचे तालुका प्रमुख रुपेश ढोके,मारेगाव पंचायत समीतीचे कृषी अधिकारी संदिप वाघमारे, सरपंच,रामचंद्र जवादे,ग्रामसेवक जनबंधु,रेवतकर,एस.पी.एनगडे, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गरजु घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार रेतीचा वाटप करण्यात आला आहे.
----------------------------------------------
घरकुल लाभार्थ्यांना माफक दरात घरपोच रेती मीळावी यासाठी रेती वाहतुक करणारे ट्रॅक्टर मालक तथा रेती भरणारे मजुर यांची संयुक्तीक बैठक घेऊन वाहातुक दर निश्चित करण्यात आला आहे. निश्चित दरापेक्षा लाभार्थ्यांनी जादा पैसे वाहतुकीसाठी खर्च करू नये यापेक्षा कमी दरात वाहतुक उपलब्ध होत असल्यास लाभार्थ्यांनी तसा पर्याय निवडावा,
*ऊत्तम निलावाड*
तहसीलदार मारेगाव
------------------------------------
ज्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात केली नसेल किंवा ज्यांची घरे रेती अभावे अर्धवट असेल, त्यांनी मोफत रेती योजनेचा लाभ घेऊन आपली घरे बांधकाम पुर्ण करावीत महाराष्ट्र दिनी आपण आपल्या घरी या अभियानांतर्गत गृहप्रवेश करावा
भिमराव व्हनखंडे
गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव
Previous Post Next Post