गुढीपाडवा उत्सव समितीमार्फत शिवतीर्थ चौक येथे भव्य गुढीपाडवा सोहळा उत्साहात साजरा



वणी शहरातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या गुढीपाडवा उत्सव समितीमार्फत शिवतीर्थ चौक येथे भव्य गुढीपाडवा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जय जगन्नाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष मा. श्री. संजयजी खाडे साहेब उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा करत सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी ईश्व प्रार्थना केली.

यावेळी विठ्ठल रुख्माई वारकरी हरिपाठ मंडळाच्या वतीने हरिपाठ सादर करण्यात आला. तसेच आयोजकांच्या माध्यमातून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी आयोजक समितीच्या माध्यमातून शाल व पुष्पगुच्छ देऊन मा. श्री. संजयजी खाडे साहेब यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्याबद्दल त्यांनी आयोजक समितीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या कार्यक्रमास वणी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post