वणी :काही महिण्या पासुन वणी शहरात व आजूबाजूच्या गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे. वणी लगत असलेल्या गणेशपुर मंगलमुर्ती पार्क प्लाट क्र. 42 गणेशपुर येथे राहत असलेल्या रामरतन सिताराम हरडे वय 59 वर्ष, WCL येथे कार्यरत असलेल्या यांच्या घरी दि.21/04/2026 चे 16/00 ते दि. 22/04/2026 चे 15/00 वा चे सुमारास घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
रामरतन सिताराम हरडे हे दरवाज्याचे कुलुप लावुन ड्युटीवर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलुप तोडून त्यांच्या घरून
दोन सोन्याच्या बांगळ्या वजन 40 ग्रॅम किंमत 1,20,000/- रु. एक सोन्याचा गोप वजन 20 ग्रॅम किंमत 60,000/- रु., दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी वजन 5 ग्रॅम असे 10 ग्रॅम किंमत 30,000/- रु., कानातील सोन्याचे लटकन वजन 6 ग्रॅम किंमत 20,000/- रु. असे एकुण 76 ग्रॅम सोन्याचे दागिने एकुण किंमत 2,30,000/- रु मुद्देमाल चोरी ला गेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशन येथे दि.23/04/2026 ला दिली.अज्ञात चोरट्यांचे विरोधात कलम 331 (3), 331 (4), 305 a BNS नोंद केली आहे पुढील तपास पोउपनि साजिद सैय्यद पोलीस स्टेशन वणी हे करीत आहे.