चिमूर तालुक्यातील नेरी येथील व्यवस्थापक प्रवीण दिवाकर वाघे यांच्या मालकीच्या "जाणता राजा टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स" या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दि 6 जूनला ग्रा प कार्यालयाच्या समोरील चाळीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर, व्यवस्थापक दिव्या वंदना आधार फोडेशन शुभम पसारकर ग्रामगीताचार्य प्रा. राम राऊत यांची उपस्थिती होती. तसेच दिव्य वंदना फाऊंडेशनच्या रोडवरीर बेघर बेवारस भीक्षेकरी अनाथ मोनोरुग्ण दिव्यांग महिला, पुरुष आणि बालगोपाल मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजूकर यांनी सांगितले की, "स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतात. प्रवीण वाघे यांनी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे."
ग्रामगीताचार्य प्रा. राम राऊत यांनी नवीन उपक्रमाला शुभेच्छा देत प्रवास क्षेत्रात प्रामाणिक सेवा देण्याचे आवाहन केले. दिव्य वंदना फाऊंडेशनच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक भानाची जोड मिळाली.
प्रवीण वाघे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि "जाणता राजा टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स" मार्फत नागरिकांना परवडणाऱ्या दरात, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवास सेवा देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती