वणी प्रभाग क्र. १2 मधील टयुबवेल खाजगी कामाकरितां वापर करण्या बाबत भीम आर्मी भारत एकता मिशन यांचे मुख्य अधिकारी नगर परिषद यांना निवेदन

वणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या ट्यूबवेलचा जनतेसाठी असलेला पाणीपुरवठा थांबवून त्या पाण्याचा खासगी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी, भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.भीम आर्मी, भारत एकता मिशनचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा अध्यक्ष रविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम, तालुकाध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांना हे निवेदन सादर करण्यात आले.तीन वर्षांपासून पाणीपुरवठा बंदनिवेदनात नमूद केल्यानुसार, वणी नगर परिषदेच्या हद्दीत मोक्षधामच्या मागील बाजूस असलेल्या नगर परिषदेच्या ट्यूबवेलद्वारे पूर्वी सेवानगर परिसर तसेच मोक्षधाम समोरील बरडपूरा भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र मागील सुमारे तीन वर्षांपासून हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.


पाणी जनतेऐवजी खासगी वापरासाठी?
आरोपानुसार, ट्यूबवेलमधील पाणी जनतेला न देता ते मोक्षधामलगतच्या खासगी जमिनीवर वापरले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, हा प्रकार नगर परिषद प्रशासनाच्या माहितीत असूनही दुर्लक्षित केला जात आहे का? की संबंधित कंत्राटदाराच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी
भीम आर्मी, भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत ट्यूबवेल कनेक्शन वळविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची तातडीने चौकशी करावीदोषींवर गुन्हा दाखल करावाआजपर्यंतचा वीज वापर आणि पाणीकराची वसुली करावीसंबंधित पाणीपुरवठा कंत्राटदारावरही कठोर कारवाई करावीनागरिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा
 नागरिकांमध्ये संतापया प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
निवेदनावर वणी विधानसभा अध्यक्ष रविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम तसेच वणी तालुका अध्यक्ष हरीश पाते, आकाश उईके, शिवेंद्र ब्राह्मणकर, मंगेश सोनोने, हरिदास गेडाम यांच्या सह्या आहेत.




Previous Post Next Post