वणी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाच्या मौजा विरकुंड येथे गावाच्या दळणवळण सुविधेला बळकटी देणाच्या सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) व खनिज विकास निधी यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी १६ लाख रुपर्यांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हे काम गावाच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.गेल्या काही काळापासून व्णी विधानसभा क्षत्रात मूलभूत सुविधांच्याविकासावर विशेष भर देण्यात येत असून, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य वशिक्षणाशी संबंधित कामांना गती देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरकुड येथील हा सिमेंट
कॉक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे ग्रामस्थांना मार्गक्रमण करणे सुलभ होणार असून, पावसाळ्यातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमाला सरपंच वर्षाताई मडावी, उपसरपंच पिनू डांगे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकाममंचे कौतुक करत, भविष्यातही अशाच पद्धतीने गावाच्या गरजांनुसार निधी उपलब्ध करू्न देण्याची अपेक्षा व्यक्त केली. वणी विधानसभा क्षेत्रात शहरी व ग्रामीण भागात समान विकास साधण्यांचा प्रयत्न सुरू असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निर्धी खेचून आणत विकासकामांचा सपाटा सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विरकुंड येथील रस्ता बांधकाम हे त्याचेच एक ठळक उदाहरण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूमिपूजनप्रसंगीउपस्थित मान्यवरांनी हा रस्ता गावाच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, असे मत व्यक्त केले. रस्त्याच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच दैनंदिन व्यवहार करणाच्या नागरिकांना मोठा लाभ होणार असून, गावाच्या आर्थिक वसामाजिक प्रगतीला चालना मिळणार आहे