अवैध रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रहार संधटना व आबेडकरी जन आदोलन यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्ातील वणी तालुक्यातील कळमना, परमडोह, मुंगोली, शिवणी, अहेरी, उकणी, बेलोरा, रांगना भुर्रकि, वरोरा रोड पाटाळा व इतर रेती घाटावरून चालणान्या अवैध रेती वाहतृकीवर आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाला, जिल्हां अधिकारी यवतमाळ तसेंच महसूल मंत्री बावनकुळे हे वणी येथे आले असता त्याना सुध्दा निवेदन देऊन मागणी केली, परंतु आत्ता पर्यत कोणतीही कारवाई झाली नाही. शहरातील देशमुखवाडी व इतर लेअऊट ठिकाणी खुलेआम रेतीचा साठा दिसत आहे. रॉंयल्टिवर नमुद असलेल्या रेती पेक्षा जास्त रेती वाहनात भरल्या जाते. अशा वाहनांवर महसूल प्रशासन कारवाई करीत नाही, ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री २ वाजता वर्धा नदी पात्रात केलेली कारवाई संशयास्पद आहे, रेती तस्करावर पोलिस कारवाई करणे अनिवार्य असल्याचा जि. आर. असताना महसूल प्रशासनाने पोलिस कारवाई ने करता दंड ठोठावून वाहने सोडली. शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली, या प्रकरणी महसूल अधिकारी यांचेवर कारवाई अभिप्रेत आहे. मागील दोन वर्षापासून घरकुल लाभार्थीं रेती मिळत नसल्यामुळे घराचे बांधकाम सुरू होव् शकले नाही. त्यांचे घराचे बांधकाम अपूर्ण अाहे, तरी मोठ मोठे ईमारती वाल्यांना रेती साठा उपल्लब्ध होत आहे. हे कुठन होत आहे ? लाभार्थीना व गोर गरीब लोकाना उन, वारा, पाऊस यांचा सामना करून झोपडीत राहावे लागत आहे. घरकुल लाभार्थाना मुबलक रेती उपल्ध करून द्वावी, विविध गैरप्रकारची चौकशी करून दोषोवर कठोर कारवाई करण्याची व ही तस्करी थाबविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना कराव्यात, महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वैध रेती तस्करोवर आळा घालावा, अन्यथा घरकृल लाभार्था यांना सोबत घेऊन एक मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल,
अवैध रेती तस्करीवर आळा घाला,,, प्रहार उपजिल्हा प्रमुख मुबीन शेख
byNTnews
-