गावकऱ्यांनी वाचवले वन प्राण्याचे प्राण

झरि जामणी तालुक्यातील कारेगाव पारंबा या गावालगत चारही बाजूने वन परिसर पसरले आहेत ह्या वनपरिसरात अनेक वन प्राणी राहतात ते वन प्राणी रात्रीच्या वेळेस आपले उदरनिर्वाह करण्या करिता वन परिसरालगत असलेल्या शेतात येत असतात ह्या वन प्राण्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करित असते परंतु आज रोजी नेहमीप्रमाणे वन प्राणी बंदर हे रात्रीच्या वेळी आपले उदरनिर्वाह करण्या करिता गावालगत असलेल्या श्री.संजयजी मोहुर्ले यांच्या शेतात आले होते व ते रात्रभर शेतात राहून सुद्धा हे एक बंदर वनामध्ये परत गेले नाही आणि दुसऱ्या दिवशी अंदाजे दुपारचे दोन वाजताच्या सुमारास गावात येणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या तारेला शॉक् लागून ते बंदर खाली कोसळले बंदरांनी विद्युत तार लागताच त्यांनी ओरडले बंदराचे ओरडणे ऐकून ग्रामवासी घटनास्थळी धावत पोहोचले घटनास्थळी पोचताच बंदर हे विद्युत प्रवाहाच्या झटक्याने खाली कोसळले हे घटना स्थळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या लक्षात आले येथील उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थाणी लगेच बंदराला उचलून आणले व गावातील हनुमान मंदिर येथे ठेवले त्या वेळेस रात्रीचे सात वाजलेले होते आणि कारेगांव पारंबा हे गाव ग्रामीण भागात असल्या कारणाने ह्या वेळेस पशु चिकिस्तक येवू शकत नव्हते ह्या कारणाने दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सात वाजताच गावकऱ्यांनी पशु चिकिस्तक यांना बोलावून बंदरावर उपचार केले व बंदराची प्रकृती थोडी ठीक होताच ग्रामस्थांनी वन विभागाच्या टीमला बोलावून बंदराला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले
Previous Post Next Post