नवेगाव विरकुंड येथे महाशिवरात्री एकादशी निमित्ताने दिंडी संपन्न

वणी : नवेगाव विरकुंड येथील समस्त गावकरी यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंनाक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री एकादशी निमित्ताने गावात भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली.

ही दिंडी हनुमान मंदिर येथून सुरू होऊन गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिर परिसरात विसर्जित झाली.

दिंडीदरम्यान हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शिवभक्तांनी पारंपरिक सहभाग घेत भजन, कीर्तन व टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीभाव व्यक्त केला. लहान मुले, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील तरुण मंडळी, ग्रामस्थ व मंदिर समितीने विशेष परिश्रम घेतले. या धार्मिक उपक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य व श्रद्धेचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Previous Post Next Post