वणी :कष्टकरी आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने, स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वणी शहरातील गरजू फळ व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा समाजोपयोगी उपक्रम चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सौजन्याने राबविण्यात आला.
स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जनसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि समाजातील कष्टकऱ्यांना कडक ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना विनम्र अभिवादन केले. छत्री मिळाल्यामुळे स्थानिक लहान व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी तेजराज बोडे, राजूभाऊ अंकितवार, अशोक चिकटे, उत्तमजी गेडाम, प्रमोद लोणारे, प्रेमनाथ मंगाम, वंदना आवारी, करुणा कांबळे, शामा तोटावर, पलास बोडे, रोहित मालेकर, अलका मोहाळे, अनंता डुभारे, सविता गंजेवार आदींसह अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.